Sunday, September 4, 2022

शिक्षक दिनानिमित्त प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या आठवणी

 आज शिक्षक दिवस.

या निमित्त सहज व आजन्म राहणारे काही शिक्षक ज्यांनी मला घडवलं.

जन्मापासून आपण काही ना काही शिकतच असतो. मात्र काही शिक्षक आयुष्याला वेगळच वळण देवून जातात

मटा पिता हे प्रथम शिक्षक पण मी आज शालेय व क्रमिक शिक्षकांबद्दल लिहिणार आहे.


बालवाडीत म्हणजे अपर्णा बालक मंदिर पन्नालाल बगीचा येथील शाळेच्या काळे बाई मला पहिल्यांदा आठवतात.

त्यांचा चेहरा आठवत नाही पण त्याच बालक मंदिरात मी प्रथम जायचो. अन् शाळेत पट्टीवर बसलेल आठवते.

मला नक्की माहीत नाही पण या बालक मंदिरात होय मंदिरच मी दोन वर्ष गेलो होतो अन् मला वाटायचं तस मी बालवाडीत नापास झाल्याने मला अजून एक वर्ष मी जायचो बालवाडीत ते विर वामनराव जोशी शाळेत.


वीर वामनराव जोशी शाळा ही गोरक्षण परिसर अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या द्वारे चालवण्यात आलेली अन् त्याच परिसरात आहे.

त्याच शाळेत मी मालती बाई चे वर्गात होतो. त्यावेळी मला त्यांनी छान बडबड गीते शिकवली. ओरोगमी म्हणजे कागदापासून नाव, विमान बनणे आम्ही शिकलो. त्यांचा चेहरा थोडा आठवते.

अन् त्यांचे नाव विशेष यासाठीच की त्यांचे अन् माझे मोठया आईचे नाव एकच होते


त्या नंतर पहिल्या वर्गातील तांबे बाई आठवतात.

त्यांनी शिकवलेल्या कविता आठवतात.

अन् त्याच सोबत त्या वेळी मी शाळेतील पहिला डान्स त्यांनीच शिकविलेला कदाचित

रडू नको कृष्णा मी पाण्याला जाते

या गाण्यात मी केलेला कृष्णाचा रोल अन् त्यासाठी मला मिळालेलं गिफ्ट लाल पांढरा प्लॅस्टिकचा डबा पण आठवतो.



दुसऱ्या वर्गाच्या शिक्षिका होत्या पितळे बाई 

त्यांचा एक वाक्य मात्र अजूनही कानात फिरतो.

अभ्यासाच्या नावाने शंख मेल्याना.

अन् अजूनही मला त्याचे हसू येते. पण त्यातून आमच्या शिक्षिकेला आमचे अभ्यासाविषयी काळजी पण दिसून येते.


यात सर्वात महत्वाच्या म्हणजे कळमकर मामी. त्या माझ्यासाठी व माझ्या पालकांसाठी पण मामीच होत्या. त्यांचा शब्द अन् त्यांची आमच्यावर असणारी बारीक नजर होती.

मला तर त्या माझ्यासाठी त्या शाळेतील मुख्य व्यक्ती होत्या.

शाळेची मला प्रचंड आवड. मग मला ताप असला तरीही मी जायचोच. मग एकदा ताप असताना मला पाठवल म्हणून त्यांनी माझ्या मम्मीला खूप रागावल. मला त्यांचे घरात झोपवून ठेवलं.

त्या मात्र मला मुख्याध्यापक पेक्षा पण भारीच वाटायच्या.


त्या वर्षीच मला पप्पाने शुद्धलेखन विषयी एकदा मारलं होतं.

मला आठवत तो भ शब्द होता. अन् दुसरीतल्या मी पप्पाला म्हंटले होते तुमच्या पेक्षाही चांगलं अक्षर काढून दाखवील अन् त्या साठी मी अक्षर सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले.

माझ्या प्रत्येक चांगल्या अक्षारमागे तेच आहेत.

परंतु आजही पप्पाचे हस्ताक्षर माझ्या हस्ताक्षर पेक्षा खूप चांगले आहेत.



तिसरी मध्ये माझ्या वडिलांची बदली झाल्याने आम्ही अकोल्याला गेलो. तिथे आमचे शेजारचे मूल ज्या शाळेत जायचे त्याच नगर परिषद मराठी मुलांची शाळा क्रमांक 9 च्या उपशाखा असणाऱ्या काळा मारुतीच्या शाळेत माझा दाखला करण्यात आला.

तिथले अवचार गुरुजींच्या वर्गात मी होतो.

त्यावेळी त्यांनी माझे पाढे छान पाठ करून घेतले.

मला अजूनही आठवते माझा मित्र अलकरी व माझे 30 पर्यंत पाढे पथा होते.

आजही ते पाढे आठवणीत आहेत.

मुलांचे त्यामुळे (आताचे table) पाढे मी पाठ करून घेतो तेव्हा ते म्हणून दाखवतो. अन् सोबतच अवचार गुरुजींच्या आठवणी ताज्या होतात.

क्रमशः


2 comments:

Subodh said...

❤️❤️❤️

Harsha said...

Khuup ch chaan.. 👌